संस्थेविषयी

" तुमच्या सारखी व्यक्ती असेल का कुणी जगती तुमच्या सारखे तुम्हीच देवही करेल तुमची भक्ती "

असं म्हणतात की देवाला प्रत्येक घरी जाणे शक्य नव्हते म्हणून देवाने तुम्हाला बनवलं असावं.

कुठून सुरु करावी अशी यशस्वी त्यांची कहाणी. जेंव्हापासून सुरुवात केली आहे तेंव्हापासून ते आतापर्यंत बघितलेली ही कथा. लोक म्हणतात की आम्ही शून्यातून प्रगती केली पण आम्ही स्वत: बघितले आहे की. एखादा कर्तृत्ववान माणूस की ज्यांच्याकडे शून्य पण नव्हते त्यांनी आपली ओळख शिक्षणाच्या शिदोरीतून महाराष्ट्रतील जवळपास २५ जिल्यात निर्माण केली. त्यासाठी हवी असते जिद्द, आत्मविश्वास,चिकाटी आणि कष्ट होय. कोहीही प्रेरणा घ्यावी अशी प्रेरणादायक कहाणी श्री राजेंद रामचंद्र माने व ज्यांच्या यशस्वी साथीने प्रगती व विकासाकडे झेप घेत आहेत त्या सौ.सुवर्णा राजेंद्र माने मॅडम होय.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील अंबप हे एक छोटस गाव. जोतिबाच्या पायथ्याशी व झुळझुळ वाहणाऱ्या वारणा नदीच्या शेजारी वसलेले हे अंबप गाव.गावामध्ये पूर्वीच्या काळात प्राथमिक शिक्षण घेण्याची अवस्था बिकट होती, पण याचं गावाला आज ज्ञानाची पंढरी म्हणून ओळखले जाते. त्यापैकी एक शिक्षण महर्षी म्हणून उदयास येणारे एक मा.श्री. राजेंद्र रा. माने याची जीवनकथा.

अंबप या गावामध्ये पंधरा एप्रिल एकोणिशे पंच्याहतर मध्ये जन्म झाला. ज्याप्रमाणे एप्रिल महिन्यात झाडांना नवीन पालवी यावी याप्रमाणे माने कुटुंबामध्ये सरांचा जन्म झाला घराची पतीस्थिती बरी तरीपण सरांनी स्वताच्या शिक्षणासाठी स्वत: काम करून शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी सर नोकरी मागण्यासाठी जात असे पण कुठेच यश येत नव्हते पण म्हणतात न घर बांधण्यापेक्षा राजवाडा बांधण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याप्रमाणे सरांनी एका शिक्षणसंस्थेचा प्रस्ताव भरला आणि त्याला मान्यता मिळाली. आणि त्यानंतर सुरु झाली शेक्षणिक व्यासपीठ सरांना फिक्स नोकरी नाही, किंवा व्यवसाय नाही,अशा परस्थितीत आणखी एक चांगली घटना घडली आणि साथ मिळाली ती म्हणजे सौ.सुवर्णा राजेंद्र माने मॅडम मुळचे घराणे शेक्षणिक वातावरणातील होते अंबप गावामध्ये ज्यांनी पहिली शाळा सुरु केली त्यांच्या मुली बरोबर सरांचे लग्न झाले. त्यांचा जावई हा वडगाव परिसरातील शिक्षण प्रसारक बनला. त्यांना साथ देण्याचे काम मॅडमांनी केले. मॅडमना दिशा इंग्लिश मिडीयम स्कुलची स्थापना करून दिली.प्रथम १५ मुलांची संख्या असताना आजपर्यंत ३५० विध्यार्थी संख्या आहे.या सर्व कार्यामध्ये सरांची बहिण सौ. मंगल पाटील,आई-वडील,थोरले बंधू बापुसो माने त्याप्रमाणे मा. श्री. प्रदीप दरवान,मा.श्री सचिन चौगुले सर यांची साथ मिळाली. तसेच सर्व हितचिंतक यांचा पाठींबा मिळाला.

संस्था सुरु करताना सरांनी तेथील काही कामे स्वत: केली. म्हणून आज प्रशालेत १२०० विध्यार्थी शिक्षण घेतात. कार्याची पोच पावती म्हणून एका वर्षात पाच राज्यातील पुरस्कार मिळाले आहेत. निवासी मुलांसाठी आवश्यक तेवढ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

निवासी शाळेनंतर आसपासच्या २५ मागील भागातील मुलांचा सैनिकी शाळेत प्रथम अनिवाशी शाळा सुरु केली. ती विध्यार्थी संस्था प्रथम ६२ होती आज ती ३५० इतकी आहे आणि विशेष म्हणजे इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा विध्यार्थी निवासी आहे.

अव्याहतपणे सुरु असलेल्या कष्टाची दखल घेऊन सरांना एक वर्षात पाच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.बुलढाणा येथील सेवा समर्पण पुरस्कार, महाराष्ट्र जर्नलिस्ट मुंबई यांच्याकडून आदर्श शिक्षक,आमदार सुजीतकुमार मीणचेकर फौंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक व कामेरीच्या विविकानंद शिक्षण संस्थेचा शिक्षकरत्न असे पुरस्कार मिळाले आहेत.

एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणं विचारांची देवाण-घेवाण करणं. खेळ व्यायाम,भटकंती हे सगळं थोडसं आजच्या काळाशी मिळतं जुळतं घेऊन आणि प्राचीन परंपरा जोपासून विध्यार्थाला देण्याचा काम या प्रशालेने नेहमीच केले आहे आणि पुढेही करत राहील अशी मी अशा व्यक्त करतो.

img7
विविध उपक्रम
img8
वस्तीग्रह
img9
फोटो गॅलरी