शाळेविषयी

स्वामी विवेकानंद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री एज्युकेशन सोसायटी, अंबाप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठ वडगांव व दिशा इग्लिश मेडीअम स्कूल, पेठ वडगांव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या नावाचे सैनिकी पॅटर्न निवशी व अनिवाशी शैक्षणिक संकुल (बालवाडी ते इ. १० वी, मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यम ) चालवाणेचा ईवलासा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्याच्या आधुनिक शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आधुनीक व पारंपरिक पद्धतीने शिक्षण देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

आजच्या स्पर्धेच्या जगात विद्यार्थी घडवित असताना विद्यार्थ्याच्या इच्छा व आकांक्षा विचारात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देण्याचा व भविष्यकाळात देशाचा सुजाण नागरिक घडविण्याचा त्यांना तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्गाकडून ज्ञानदानाचे पवित्र कार्य या ठिकाणी केले जाते. पारंपरिक पद्धतिची गुरुशिष्याची विरत जाणारी शैक्षणिक परंपरा येथे जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्यांना लागणाऱ्या सुविधा, त्यामध्ये सुसज्ज वसतिगृह, स्वच्छ व नीटनेटके भोजनगृह, वर्ग, शैक्षणिक साधने, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा साधने इ. भौतिक सुविधा, त्याचबरोबर तज्ञ क्रीडा प्रशिक्षक वर्गामार्फात विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. (लाठीकाठी, दांडपट्टा, मल्लखांब, योगा, ज्युदो, कराटे, बेसबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, रोपास्केपिंग, हॉर्स रायडींग, धनुर्विद्या, खो-खो, कुस्ती, वुडबॉल, ॲक्रोबॅटिक्स, ॲथलेटीक्स, रायफल शुटींग, स्केटिंग, ड्रील इ.)

यामुळेच आमच्या विद्यालायातील विद्यार्थीनी अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर ३७, राष्ट्रीय स्तरावर १८४ व राज्यस्तरावर ८८३ खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील यशाबरोबरच बौद्धिक क्षेत्रामध्ये देखील आमच्या शाळेतील विध्यार्थीनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यामध्ये इयत्ता १० वी परीक्षेचा सातत्याने १००% निकाल, स्कॉलरशिप, एम.टी.एस., एन.टी.एस., जी.टी.एस.ई., सामान्यज्ञान स्पर्धा यामध्ये यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. तरी उज्वल भारताचे सुजाण नागरिक बनविण्यासाठी संधी आपण आम्हाला द्यावी हि नम्र विनंती.

img7
विविध उपक्रम
img8
वस्तीग्रह
img9
फोटो गॅलरी